अद्वैत
सूर्य तू ,किरण तू
प्रकाश तू ,अंधार तू
ढीग तू ,रास तू
खग्रास तू ,नक्षत्रांच्या दशा तू
तारे तू , तारका तू
कृष्ण तू , कृष्णविवर तू
शिष्य तू ,गुरु तू
पृथ्वी तू ,पूर्व पशिम दिशा तू
योग तू ,संयोग तू
रोग तू ,इलाज तू
जन्म तू ,मरण तू
प्राणी तू , लक्ष लक्ष योनी तू
स्थिती तू ,मिती तू
चित्त तू ,निमित्त तू
पित्त तू ,वात तू
तूप तू , तेजोमय ज्योत तू
अणू तू ,रेणू तू
पोकळ तू , भरीव तू
दगड तू ,माती तू
मूर्ती तू , घडविणारे हात तू
श्वास तू ,उचछवास तू
सुगंध तू ,दुर्गंध तू
हवा तू , पावा तू
वारा तू , विश्वाचा पसारा तू
झाड तू , वेली तू
फुल तू , बीज तू
दुध तू ,वीर्य तू
अंड तू ,ब्रम्हांड तू
शून्य तू ,पूज्य तू
ईश्वर तू ,नश्वर तू
मीच तू ,तूच मी
द्वैत तू ,अद्वैत मी
Leave a Reply