सती
नसे तयारी मना न चित्ती
चेचुनी मना करुनी माती
सजवूनी मातीची कांती
किती यौवना फसती नासती
रोज अनिच्चे खेळ मांडी
निर्लज्ये होवुनी लाज सांडी
मग समोरचाही ओरबाडी
काळी,गोरी सारी कातडी
वर बाष्फळ समाजाची वांती
रोज शिकवी तिलाच नीती
युगेन युगे हि अशीच कणकण
जळतसे रोज नग्न प्रतिक्षण
निर्लज्ये हासोनी जाळोनी सर्व नाती
पतीविना जशी ……..सती
Leave a Reply